राजस्थान रॉयल्सचा सामना डेक्कन चार्जर्सशी

March 26, 2010 10:34 AM0 commentsViews: 1

26 मार्च आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्सचा सामना असेल तो डेक्कन चार्जर्सशी. सलग दोन विजय मिळवल्याने राजस्थान रॉयल्सच्या टीमचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढला आहे. बॅटिंगमध्ये एकट्या युसुफ पठाणवर अवलंबून असलेल्या राजस्थानच्या इतर बॅट्समननेही गेल्या मॅचमध्ये किंग्ज इलेव्हनविरुध्द चांगली कामगिरी केली आहे. पण कॅप्टन शेन वॉर्नला बॉलिंगमध्ये अजूनही सूर सापडलेला नाही. ही टीमसाठी चिंतेची गोष्ट आहे. दुसरीकडे डेक्कन चार्जर्सची टीम चांगली फॉर्मात आहे. चार मॅचपैकी डेक्कनने तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे.

close