सांगलीमध्ये मुलींची छेडछाड करणार्‍या तिघांना अटक

May 8, 2016 4:02 PM0 commentsViews:

rape_634565

07 मे : सांगलीत गावगुंडाच्या भीतीनं ज्या मुलींना शाळेत जाणं अवघड बनलं होतं, त्या गावगुंडावर अखेर कारवाई केली गेली आहे. याप्रकरणी 4 आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आलीये. तर एकजण मात्र फरार आहे. याप्रकरणात राजेंद्र पवार, इंद्रजित खोत, सागर खोत आणि अमयसिद्ध बबळेश्वर अशी या चौघांची नावं आहेत. त्यांच्यावर पाठलाग करणं, विनयभंग करणे, असे गुन्हे दाखल झाले आहेत.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या मसुचीवाडी या गावासह अनेक गावातील मुलं, मुली बोरगाव याठिकाणी शिक्षणासाठी येतात. मात्र, त्यादरम्यानच्या वाटेवर गावगुंड नेहमी मुलींची छेडछाड काढायचे. त्याला कंटाळून मुलींना बोरगावात न पाठवण्याचा निर्णय मसुचीवाडीच्या लोकांनी घेतला होता.

धक्कादायक म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरु असल्याची माहिती गावकर्‍यांनी दिली आहे. मात्र आता तब्बल दोन वर्षांनी गावगुंडावर कारवाई करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा