कांजूरमार्गमधील अशोक नगरमध्ये एकाच रात्रीत 13 घरात घरफोडी

May 8, 2016 4:27 PM0 commentsViews:

êÖêËÖêêËÖêopy

08 मे : कांजुरमार्गमधल्या अशोक नगरमध्ये एकाच रात्रीत 13 घरात काही तासातच घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. यात अंदाजे 30 ते 35 तोळं सोने आणि 2 लाख रुपयेपर्यंत रोख रक्कम या चोरांनी लंपास केली आहे. काल (शनिवारी) रात्री 3 वाजताच्या दरम्यान ही घर फोडी झाली आहे.

ज्या ज्या घरी चोरी झाली आहे, त्यातील बहुतेक सगळ्याच घरातील माणसं गावाला गेलेली होती. चोरांनी घरांचे कडी कोंयेडे तोडून घरातील कपाटाचे लॉकर देखील तोडले आहेत. घरांवर पाळत ठेवून ही चोरी झाली असल्याचा संशय स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. ही सर्व घरं बैठ्या चाळीत आहेत, आजूबाजूच्या घरातील रहिवाश्यांना ही घरं फोडताना जरादेखील आवाज आला नाही. याप्रकरणी कांजुरमार्ग इथल्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलीस पुढचा तपास करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा