क्लोरिन गॅस गळतीमुळे कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास

May 8, 2016 5:57 PM0 commentsViews:

ËêÖêy

08 मे : नाशिकमधल्या इगतपूरी इथल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या तलावातील फिल्टर हाऊसमध्ये क्लोरीन गॅसची गळती झाली आहे. त्यामुळे परिसरात राहाणार्‍या कर्मच्यार्‍यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. या सर्व कर्मचार्‍यांना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फिल्टर हाऊस जुने असून ते वापरात नव्हते. गॅस गळतीची माहिती मिळताच अग्निशामकचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तसेच पालिकेचे अधिकार्‍यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

ही गॅस गळती कशामुळे झाली, याचा तपास सुरू आहे. तिथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे घडली की तिथल्या गॅस टाकी जुनी झाल्याने घटना घडली आहे, अशा दोन्ही शक्यता यावेळी तपासण्यात येत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा