पाईपफुटी सुरूच

March 26, 2010 12:37 PM0 commentsViews: 3

26 मार्चअपुर्‍या पावसामुळे पाणीटंचाई सोसणार्‍या मुंबईकरांच्या पाणीसंकटात सध्या एक नवीच भर पडत आहे. आणि ती म्हणजे पाईप फुटण्यांची. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भिवंडीच्या जवळ मुंबईला पाणीपुरवठा करणारी मोठी पाइपलाइन फुटली. काल आधी मुलुंडच्या एलबीएस मार्गावर तानसा धरणाची 72 इंची पाईपलाईन फुटली. त्यानंतर पाठोपाठ ठाण्यातल्या कापूरबावडी इथे बीएमसीच्या जलअभियंता कार्यालय परिसरातच पाईपलाइन फुटली. या दोन्ही ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया गेले. या पाईपलाईन दुरुस्त होत नाहीत तोच सांताक्रुझ इथे पुन्हा पाईपलाइन फुटली. पाईपलाइन फुटण्याच्या या प्रकारांवर उपाययोजना करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तानसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणारी 43 किलोमीटरची पाईपलाइन येत्या दोन वर्षांमध्ये बदलण्यात येईल. त्यासाठी 380 कोटींची तरतूद बजेटमध्ये करण्यात येणार आहे, अशी घोषणा बीएमसीचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी पत्रकार परिषदेत केली.

close