नाशिकमध्ये विजांच्या कडकडटासह पावसाची हजेरी

May 8, 2016 9:23 PM0 commentsViews:

Untdsadasapy

08 मे : नाशिकमध्ये विजांच्या कडकडटासह पावसाने हजेरी लावली. उन्हापासून आणि उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नाशिककरांना अचानक आलेल्या पावसाने दिलासा मिळाला. याआधी नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली होती. आज शहरात जोरदार वार्‍यासह पाऊस पडला.

नाशिकच्या ग्रामीण भागात देखील जोरदार पाऊस झाला. दिंडोरी, वणी, चांदवड या ठिकाणी पाऊस पडला. गारांचा पाऊस झाल्याने द्राक्ष बागांचे नुकसान झाले तसेच कांदा आणि इतर पिकांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा