उत्तराखंडमधील 9 बंडखोर आमदार अपात्रच

May 9, 2016 12:29 PM0 commentsViews:

sdsadas

09 मे :  उत्तराखंडमध्ये हरीश रावत यांना मंगळवारी होणार्‍या विश्वासदर्शक ठरावापूर्वी दिलासा देणारा निर्णय आज (सोमवारी) उत्तराखंड हायकोर्टाने दिला आहे. कोर्टाने काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांना या ठरावावेळी मतदान करण्यास अपात्र ठरवलं आहे. या 9 आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

उत्तराखंड हायकोर्टाच्या खंडपीठाने आज हा निर्णय सुनावत 9 आमदारांना अपात्र ठरवलं. या 9 आमदारांना उद्या होणार्‍या विश्वासदर्शक ठरावावेळी मतदान करता येणार नाही. परिणामी माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांचा मार्ग सुकर झाला आहे. या आमदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून, या याचिकेवर आज दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे.

उत्तराखंड विधानसभेत 70 आमदार असून, यात काँग्रेसचे 36 तर भाजपचे 28 आमदार आहेत. काँग्रेसच्या नऊ आमदारांनी बंड केल्याने सरकार अडचणीत आले होते. आता हरीश रावत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 31 आमदारांची गरज आहे. केंद्र सरकारने इथे राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा