संमेलन झाले हायटेक

March 26, 2010 12:49 PM0 commentsViews: 1

26 मार्चपुण्यातील 83वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केवळ पुणेकरच नव्हे तर राज्यभरातील साहित्य रसिक अनुभवत आहेत. ही किमया साधली गेली आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिगमुळे. संमेलनाच्या उद् घाटनाचा सोहळा औरंगाबादकरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिद्वारे अनुभवला. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात दाखवण्यात येत असलेल्या या थेट प्रक्षेपणाला साहित्य प्रेमींनी गर्दी केली.साहित्य परिषदेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागपूरच्या बुटी हॉलमध्येही संमेलन व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात येत आहे. कोल्हापूरकरही हा साहित्य आणि तंत्रज्ञानाचा अभिनव महोत्सव अनुभवत आहेत. सकाळी करवीर नगर वाचन मंदिर ते रामभाई सामाणी हॉलपर्यंत ग्रंथ दिंडीही काढण्यात आली. या दिंडीत साहित्यरसिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

close