चूक असेल तर भुजबळांना नसेल तर सरकारला किंमत चुकवावी लागेल -पवार

May 9, 2016 4:10 PM0 commentsViews:

pawar_on_bjp_newsसातारा – 9 मे : चूक केली नसेल तर सरकारला आणि झाली असेल तर भुजबळांना किंमत चुकवावी लागेल अशा सुचक शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  फडणवीस सरकारला इशारा दिलाय. ते सातार्‍यात पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांची पाठराखण केलीय. सत्तेचा गैरवापर करून भुजबळांना अटक झालीय, या प्रकरणाचा पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही असं पवार म्हणाले. पण पुढे मात्र पवारांनी त्यांच्या शैलीतलं एक वाक्यही टाकलं. चूक केली नसेल तर सरकारला आणि झाली असेल तर भुजबळांना किंमत चुकवावी लागेल, असंही पवार म्हणाले. तसंच मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली. याचा समाचारही पवारांनी घेतला. दुष्काळ हा पश्चिम महाराष्ट्रातही आहे. त्या भागाची व्यथा त्यांनी पंतप्रधानांसमोर मांडली असती तर बरं झालं असतं कारण ते सर्व राज्याचे मुख्यमंत्री आहेत असा टोला पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा