पुण्यात मंगळवार पेठेत झोपडपट्टीत आग आटोक्यात

May 9, 2016 3:22 PM0 commentsViews:

pune_fireपुणे – 09 मे : मंगळवार पेठ येथे झोपडपट्टीला लागलेली आग आटोक्यात आलीये. या दुर्घटनेत 4 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या अनेक झोपडपट्‌ट्या जळून खाक झाल्यात.

मंगळवार पेठेतील भीमनगर झोपडपट्टीत दुपारी 2 च्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी जवळपास 15
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या. या आगीमुळे झोपडपट्टीत असलेले काही सिलेंडर देखील फुटले. मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत 4 जण किरकोळ जखमी झाले. ही आग कशा मुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा