बलात्काराच्या प्रयत्नात असणार्‍या नराधमाची धुलाई

May 9, 2016 7:00 PM0 commentsViews:

कोल्हापूर – 09 मे : इचलकरंजीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला जमावानं बेदम चोप देत त्याची धिंड काढलीय. इचलकरंजीतल्या जवाहरनगर भागात ही घटना घडलीय. दिलीप सुतार असं या नराधमाचं नाव असून मद्यधुंद अवस्थेमध्ये त्यानं हे कृत्य केलंय.kolhapur_3

दिलीप सुतार हा जवाहरनगर भागात संशयास्पद फिरत होता. त्याचवेळी एका झोपडीतल्या लहान मुलीला खाऊचं आमिष दाखवून तिला तो अज्ञातस्थळी घेऊन गेला. आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच स्थानिक महिलांना ही गोष्ट लक्षात आली आणि महिलांनी आणि नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला. आणि त्याची त्याच भागातून धिंड काढली.

यावेळी दिलीप यानं तिथून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. पण तिथल्या तरुणांनी त्याला पकडलं. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झालीय. यापुर्वीही दिलीप सुतार यानं अनेक महिलांना त्रास दिल्याचीही चर्चा या भागात आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या भागातल्या महिलांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा