नवी मुंबईत बिल्डर राज कंदारींचा आत्महत्येचा प्रयत्न

May 9, 2016 9:15 PM0 commentsViews:

raj kandari3नवी मुंबई – 09 मे: नवी मुंबईमधील स्वराज बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्सचे प्रसिद्ध मालक राज कंदारी यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सानपाडा येथील राहत्या घरी त्यांनी डोक्यात गोळी घालून घेतली. जखमी अवस्थेत त्यांना वाशीच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.

राज कंदारी यांनी चेंबूर, ऐरोली, कोपरखैरणे, सानपाडा, उलवे, नविन पनवेल येथे मोठे टॉवर उभारले आहेत. राज कंदारी हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात असल्याचे सांगितलं जात आहे. त्यांनी नवीन पनवेल आणि उलवा येथे हातात घेतलेल्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये त्यांचे मोठे नुकसान होत होते. पनवेलमधील वाकडी गावाजवळ 99 एकर जागेत स्वराज लगुना हा राज कंदारी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. मात्र, या प्रोजेक्टला काही परवानग्या मिळत नव्हत्या. तर उलवा येथील होम प्रोजेक्ट ला काही राजकीय कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याचं समजत आहे. त्याच बरोबर गेल्या काही दिवसापासून ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे आता राज कंदारी यांनी आत्महत्येचा केलेला प्रकार म्हणजे ठाण्यातील ‘सुरज परमार’ प्रकरण तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा