‘आर्ची’ला पाहण्यासाठी तोबा गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

May 9, 2016 10:47 PM0 commentsViews:

09 मे : ग्रामीण भागात सैराटचं एवढं याड लागलंय की या सिनेमाची हिरोईन रिंकू राजगुरू जिथं कुठं जातेय. तिथं तिथं तिला पाहण्यासाठी चाहत्यांच्या अक्षरशः उड्‌या पडताहेत.तळेगावनंतर सांगलीतही तोच प्रकार बघायला मिळाला. सांगली येथील कवठेमंहकाळ येथे एका कपड्याच्या शोरुमच्या उद्घाटनसाठी बहुचर्चित सैराट चित्रपटाची अभिनेत्री रिंकू राजगुरू आली होती. यावेळी आर्चीला पाहण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला.sangali3


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा