मुंबईतील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

May 10, 2016 8:31 AM0 commentsViews:

Sex racket

10 मे:  मुंबई पोलिसांनी काल (सोमवारी) रात्री छापेमारी करत एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 2 मॉडेल्सना आणि एका एजंटला अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या अधिकाऱयांना मिळालेल्या माहितीनुसार गोरेगावात देह विक्रयासाठी मॉडेल्स जाणार असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी जाळे टाकले आणि ओबेरॉय मॉलच्या खाली एका कारमधून दोन्ही मॉडेल्सला अटक केली.

मॉडेल्सना अटक केल्यानंतर पोलिसांनी पीटा कायद्यांतर्गत तसेच देह विक्रयाशी संबंधित वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी करत आहेत. दरम्यान, प्रकरणाचा तपशील देण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा