उत्तराखंडच्या शक्तिपरीक्षणात काँग्रेसचा विजय, सूत्रांची माहिती

May 10, 2016 12:15 PM0 commentsViews:

harraw-kYRF--621x414@LiveMint
10 मे: 
उत्तरांखडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडीवर अखेर आज (मंगळवारी) पडदा पडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने 34 मतं मिळवत बहुमत सिद्ध केलं आहे. तर, भाजपला 28 मतं मिळाली आहेत. मात्र, या बहुमत चाचणीचा अधिकृत निकाल बुधवारी सुप्रीम कोर्टात जाहीर करण्यात येणार आहे.

काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांना विधानसभेत होणार्‍या बहुमत चाचणीत अपात्र ठरवल्यानंतर आज (मंगळवारी) सकाळी बहुमत चाचणी घेण्यात आली. बसपचे अध्यक्षा मायावती यांनी बहुमतावेळी काँग्रेसला मतदान करणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. काँग्रेस आमदार रेखा आर्या यांनी भाजपला, तर एका भाजप आमदाराने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं. प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटीक फ्रंटचे 6 आमदार असून त्यांनीही काँग्रेसला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत.

बंडखोर आमदारांनी अपात्रेतेविरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टाने सोमवारी सकाळी फेटाळल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टानेही हायकोर्टाच्या निर्णयावर कोणताही अंतरिम आदेश देण्यास नकार दिल्याने बंडखोर आमदारांना शक्तिपरीक्षेवेळी मतदान करता येणार नाही, हे स्पष्ट केलं. कोर्टाच्या या निर्णयामुळे काँग्रेसचे राज्यातील नेते आणि मावळते मुख्यमंत्री हरीश रावत यांना बहुमत चाचणीवेळी फायदा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा ठराव आपणच जिंकू असा विश्वास काँग्रेसला वाटतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा