आता नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून येणार, राज्य सरकारचा निर्णय

May 10, 2016 4:33 PM0 commentsViews:

1mumbai_mantralyat10 मे : राज्यात यावर्षी डिसेंबरमध्ये 215 नगरपालिकांची निवडणूक होणार आहे. यासाठी नगरपालिकेत 2 वॉर्डचा मिळून एक प्रभाग असणार असून आता नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून येणार आहे असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

येत्या नगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री मंडळानं काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. यात नगराध्यक्षपदाची निवडणूक आता थेट होणार आहेत. त्याशिवाय नगपालिकेच्या निवडणुका वार्ड ऐवजी प्रभाग पद्धतीनं होणार आहेत.

यात आता दोन वॉर्डाचा मिळून एक प्रभाग केला जाणार आहे. या संदर्भातला अध्यादेश लवकरचं काढण्यात येणार आहेत.

सत्ताधारी पक्षाला येत्या डिसेंबर महिन्यात होणा-या नगरपालिका निवडणुकीत या निर्णयाचा फायदा होईल आणि म्हणूनचं हा निर्णय घेतला गेलायं असं बोललं जातंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा