डान्सबारला 2 दिवसांत परवाने द्या, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आदेश

May 10, 2016 4:49 PM0 commentsViews:

dancebar10 मे : डान्सबार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय. डान्सबार चालकांना परवाने देण्यात उशीर का होतोय ? असं विचारत दोन दिवसांच्या आत 8 डान्स बार्सना परवाने द्या, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा छमछम सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारची डान्सबार बंदीबाबात नाचक्की झाली. डान्सबार यासाठी राज्य सरकारने नवं विधेयक तयार केलंय. डान्सबारसाठी राज्य सरकारने नवी नियमावली आखली आहे. पण आज सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला डान्सबार परवान्यावरून फटकारलं. डान्सबार चालकांना परवाने देण्याआधी गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून परवाने देण्याचे कोर्टाचे आदेश होते. तो तपास अजून सुरू आहे, म्हणून परवाने देण्यात उशीर होतोय, असं सरकारनं कोर्टात म्हटलं. पण त्यावर कोर्टाने म्हटलं की, 8 डान्सबार्सकडून हे लिहून घ्या की आम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या व्यक्तींना कामावर ठेवणार नाही, आणि त्यांना दोन दिवसांत परवाने देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. आता या प्रकरणावर पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा