नाशिक ते पुणे 3 तासांत !, अवयव प्रत्यारोपणासाठी थरारक प्रवास

May 10, 2016 7:09 PM0 commentsViews:

नाशिक – 10 मे : पुण्यात होणार्‍या यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी इतिहासात पहिल्यांदाच नाशिकमधून यकृत पुण्याच्या दिशेनं रवाना करण्यात आलं. नाशिकच्या एका महिलेच्या मृत्युनंतर तिचं यकृत आणि किडनी पुण्याच्या रुग्णासाठी यशस्वीरित्या नेण्यात आलंय. सहा तासांचा नाशिक-पुणे दरम्यानचा प्रवास अवघ्या तीन तासांत पार करण्याचं आव्हान पोलीस आणि डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या पार केलं.nashik3

मरावे परी किर्तीरुपी उरावे असं म्हटलं जातं…नाशिकच्या एका महिलेच्या बाबतीत अशीच एक घटना घडली आहे..नाशिकच्या शोभा
लोणारे या 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या दोन किडनी, डोळे आणि यकृतदान करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. योगायोगानं पुण्यात एका रुग्णास यकृताची आवश्यक्ता असल्यानं तातडीनं नाशिकच्या ह्रषिकेश हॉस्पिटलमधून हे यकृत पुण्याला पाठवण्याचं प्रयोजन सुरू झालं. सहा तासांच्या आत यकृताच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली तरच ती यशस्वी होत असल्यानं नाशिकहुन निघालेलं यकृत तीन साडेतीन तासात पुण्यात पोहोचण महत्त्वाचं होतं.

दरम्यान, नाशिक पोलिसांच्या वतीनं, हे यकृत नियोजित वेळेत पुण्याला पोहोचावं यासाठी ग्रीन कॉरिड़ॉर घोषित करण्यात आला. यामुळे नाशिक आणि पुणे दरम्यानच्या संपुर्ण वाहतुकीला थांबवण्यात आली होती. पंतप्रधानांच्या वेळेस असते तशी वाहतुकीची व्यवस्था या वेळी करण्यात आल्याचं पोलीस अधिकार्‍यांनी सांगितलंय.

सकाळी 11.43 च्या सुमारास एक यकृत, एक किडणी घेवुन एक विशेष ऍम्ब्युलन्स पुण्याच्या दिशेनं रवाना झाली. यावेळी या गाडीच्या मार्गावरील संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली होती.उत्तर महाराष्ट्रातून पुण्याला अवयव नेण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. यात पोलिसांचं विशेष कौतुक करायला हवं, कारण सकाळच्या गर्दीच्या वेळी त्यांनी नाशिक शहरात ग्रीन कॉरिडॉर निर्माण करून दाखवला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा