काँग्रेस-अमिताभ वाद अधिवेशनात

March 26, 2010 2:21 PM0 commentsViews: 1

26 मार्चवांद्रे वरळी सीलिंक उद् घाटनप्रसंगी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीमुळे काँग्रेसमधील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.हा मुद्दा विधानसभेतही चर्चेला आला. या वादामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. आमदार नाना पटोले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. विधानपरिषदेत नीलम गोर्‍हे आणि दिवाकर रावते यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. या घटनेमुळे आघाडीमधील बेबनाव उघड झाला आहे.