बैलगाडीवरुन पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, मृत्यूचा थरार कॅमेर्‍यात कैद

May 10, 2016 9:00 PM0 commentsViews:

नाशिक -10 मे : परंपरेच्या नावाखाली चांदवड तालुक्यात एका तरुणाला आपला जीव गमाववा लागलाय. खंडेराव महाराज यात्रेदरम्यान बैलगाडीवरुन तरूण खाली पडला आणि तीन बैलगाड्यांखाली सापडला. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झालाय. हा सर्व प्रकार कॅमेर्‍यात कैद झाला.chandwad33

चांदवड तालुक्यात दरवर्षी खंडेराव महाराजांची यात्रा भरते. परंपरेनुसार या यात्रेत एका तरुणाला सजवलं जातं आणि हा तरुण तब्बल 12 बैलगाड्या ओढतो आणि त्यामागून इतर बैलगाड्या येतात. यावर्षी यात्रा साजरी होत असताना बैलगाड्या ओढणारा तरूण बैलगाडीवरुन खाली पडला. आणि त्याच्या अंगावरुन एका पाठोपाठ एक अशा तीन बैलगाड्या गेल्या. या घटनेत हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला मालेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आकास्मिक मृत्युची नोंद केली आहे. यात्रेत बैलगाडी ओढण्याची तीनशे वर्षांची परंपरा असल्याचं आयोजक सांगत आहेत. मात्र या तरुणाच्या मृत्युला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण होतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा