नवी मुंबईतील बिल्डर राज कंदारी यांचा मृत्यू

May 10, 2016 10:40 PM0 commentsViews:

नवी मुंबई – 10 मे : नवी मुंबईमधील स्वराज बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्सचे प्रसिद्ध मालक राज कंदारी यांची झुंज अपयशी ठरली असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. काल सोमवारी कंदारी यांनी ाी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.raj kandari3

कंदारी यांनी सानपाडा येथील राहत्या घरी डोक्यात गोळी घालून घेतली. जखमी अवस्थेत त्यांना वाशीच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कालपासून त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. मात्र, आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. राज कंदारी यांनी चेंबूर, ऐरोली, कोपरखैरणे, सानपाडा, उलवे, नविन पनवेल येथे मोठे टॉवर उभारले आहेत.

राज कंदारी हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात असल्याचे सांगितलं जात आहे. त्यांनी नवीन पनवेल आणि उलवा येथे हातात घेतलेल्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये त्यांचे मोठे नुकसान होत होते. पनवेलमधील वाकडी गावाजवळ 99 एकर जागेत स्वराज लगुना हा राज कंदारी यांचा ड्रीम प्रोजेक्टट होता.

मात्र, या प्रोजेक्टला काही परवानग्या मिळत नव्हत्या. तर उलवा येथील होम प्रोजेक्ट ला काही राजकीय कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याचं समजत आहे. याआधीही ठाण्यात सुरज परमार यांनी राजकीय त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. कंदारी यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अजून स्पष्ट होऊ शकलं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा