भुजबळ काका-पुतण्यांना जामीन की पुन्हा कोठडी ?,आज सुनावणी

May 11, 2016 9:02 AM0 commentsViews:

bhujbal discharge11 मे : माजी सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांची कोठडी आज संपणार आहे. भुजबळांनी पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. भुजबळांना जामीन मिळतो की कोठडी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरण आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ अटकेत आहेत. ते गेल्या दीड महिन्यापासून ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यांनी पहिल्यांदाच जामिनासाठी अर्ज केला आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या विशेष न्यायालयाचे न्या. पी. आर. भावके यांच्यापुढे सोमवारी याचिकेवर सुनावणी झाली. जामिनाबाबत राज्य सरकारने भूमिका मांडावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. भुजबळांचा पुतण्या समीरही ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपी असिफ बलवा यांनीही जामिनासाठी आणि न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावरही सुनावणी होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा