आता मुंबईत व्यावसायिक इमारतींच्या टेरेसवरही रंगणार पार्ट्या

May 11, 2016 9:18 AM0 commentsViews:

 mumbai_hotel11 मे : मुंबईत पार्टी करण्यासाठी आता मुंबई महापालिकेनं नवी जागा उपलब्ध करून दिलीये. व्यावसायिक इमारतींवर हॉटेल सुरू करण्यास पालिकेनं परवानगी दिलीये.

मुंबईत व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवर हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. त्यामुळे हॉटेल्स, पंचतारांकित हॉटेल्स, लॉजच्या इमारतींच्या गच्च्यांवर मुंबईकरांना पार्टी एँजॉय करता येणार आहे.त्यासाठी महापालिकेनं नियमावलींमध्ये बदलही केले आहेत. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी याबाबतची सूचना केली होती. मात्र असं हॉटेल सुरू करताना गच्चीवर कायम स्वरूपी बांधकाम करता येणार नाही. फक्त ओटा आणि प्रसाधनगृहच उभारण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना रात्रीचं जीवन अनुभवता येणार आहे. तसंच रोजगारांमध्येही वाढ होणार असल्याचं सांगितलं जातंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा