भाऊसाहेब चव्हाणच्या बँक लॉकरमध्ये सापडलं 6 किलो सोनं

May 11, 2016 9:30 AM0 commentsViews:

WhatsApp-Image-20160506 (1)नाशिक -11 मे : कोट्यवधीची फसवणूक करणार्‍या केबीसी घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार भाऊसाहेब चव्हाण यांच्या बँक लॉकरमध्ये तब्बल 6 किलो सोनं सापडलंय. अजूनही काही लॉकर उघडणे बाकी आहे.

भाऊसाहेब चव्हाण याच्या फक्त एका बँक लॉकरमधून तब्बल 6 किलो 600 ग्रॅम सोन्याचे गोल्ड कॉईन मिळाले आहेत. बाजारभावाप्रमाणे याची किंमत 2 कोटींच्या घरात जाते. पोलिसांनी मंगळवारी हे लॉकर ताब्यात घेतलं त्यावेळी हे सोनं बघून पोलिसांचं डोळेच पांढरे व्हायचे बाकी होते. पोलिसांनी आतापर्यंत चव्हाणचं 82 कोटींची मालमत्ता जप्त केलीय. भाऊसाहेब चव्हाणची पत्नी आरतीच्या नावावर हे बँक लॉकर्स आहेत. चव्हाणच्या इतर बँक मालमत्तेची चौकशी सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा