मुख्यमंत्र्यांनी केलं सैराट टीमचं कौतुक

May 11, 2016 11:44 AM0 commentsViews:

11 मे :  सैराटच्या लोकप्रियतेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतलीये. मंगळवारी त्यांनी सैराटच्या टीमला वर्षा बंगल्यावर बोलावलं आणि तोंडभरून कौतुक केलं. आर्ची आणि परश्या आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी याबद्दल आनंद व्यक्त केलाय. आपल्या सिनेमाला इतकं यश मिळेल आणि त्याची इतक्या उच्च पातळीवर दखल घेतली जाईल असं आपल्याला वाटलं नव्हतं, आपण यामुळं खुपचं आनंदीत झालेत असं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा