26/11 मागे पाकिस्तानच

March 26, 2010 2:36 PM0 commentsViews: 1

26 मार्चमुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडलीने त्याच्या सुनावणी दरम्यान पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांची नावे जाहीर केली आहेत. मेजर सय्यद, मेजर इक्बाल, मेजर समीर आणि कर्नल शाह अशी त्या लष्करी अधिकार्‍यांची नावे आहेत. हेडलीकडून पहिल्यांदाच अशा प्रकारची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यातून आता हे स्पष्ट झाले आहे की, मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमागे थेट पाकिस्तानी लष्कराचा हात होता.

close