छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

May 11, 2016 3:22 PM0 commentsViews:

30BM----Sonam--_01_2835853f

मुंबई – 11 मे:  महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणी संपायचं नाव घेत नाहीये. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी तपासात गती नसल्यामुळे दोघांच्याही मुंबई सेशन कोर्टाने कोठडीत वाढ केली आहे.

याआधी वाढ करण्यात आलेल्या कोठडीची मुदत बुधवारी संपल्याने दोघांचीही कोठडी वाढवून देण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयातर्फे कोर्टाकडे करण्यात आली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने भुजबळ काका-पुतण्याच्या कोठडीत 25 मेपर्यंत वाढ केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा