बैलगाडीतून लग्नाची वरात

May 11, 2016 3:26 PM0 commentsViews:

11 मे : आजच्या काळात लग्न म्हटलं की, वाजत गाजत कारमध्ये वरात येते. मोठा खर्च..मात्र भंडार्‍याच्या लाखांदूर तालुक्यातील एका तरुणाने पारंपारिक पद्धतीने बैलगाडीतून लग्नाची वरात काढली. शेतीत धान्य पिकत नसल्याने शेतकरी मुलांच्या लग्नाच्या चिंतेत असतो आणि आत्महत्या करतो. त्यामुळे लग्नावर खर्च न करता, वरातीसाठी पारंपरिक मार्ग अवलंबण्याचा निर्णय मनोज राऊतने घेतला. त्याला घरच्यांनी विरोध केला. मात्र, शेवटी त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि या पद्धतीने 18 बैलगाड्या सजवून वरात निघाली. ही अनोखी वरात जात असतांना काही जण सेल्फी काढत होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा