अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मिळाला मुहूर्त?

May 11, 2016 10:38 PM0 commentsViews:

sfdosdfjisadj

11 मे: गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराला या महिन्यात मुहुर्त मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात दिल्लीला घटक पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये भाजपचे तिनही मित्र पक्षाचे नेते सहभागी झाले होते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत.

भाजपच्या कोट्यातून पाच ते सहा जणांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. मात्र मंत्रीपदासाठी गुडघ्याला बांशीग बांधून तयार असणार्‍या जेष्ठ आणि तरुण नेत्यांची संख्या खूप जास्त आहे. यातील अनेक नेत्यांच्या नावावर राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाच एकमत आहे. मात्र ही कसरत करतांना जातीच समिकरण आणि प्रादेशीक समतोल साभाळावा लागतो. तर रासप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटकडून नाव निश्चित आहेत. केवळ आठवले गटाकडून नेहमीप्रमाणे नावांचा घोळ सुरू आहे, मात्र प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर यांच नाव प्रामुख्याने पुढ येतय.

दरम्यान, या मंत्रीमंडळ विस्तारात 10 नव्या चेहर्‍यांना स्थान दिल जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक जेष्ठ मंत्र्याची खाती काढून नव्या मंत्र्याना द्यावी लागणार आहे. सध्या मंत्रीमडळात अनेक जेष्ठ मंत्र्याकडे पाच पाच खात्याचा कारभार आहे. त्यामुळे या मंत्र्याना प्रशासन हाकतांनी तारेवरची कसरत करावी लागते. सर्वच खात्यावर निट लक्ष देता येत नाही. मात्र मात्र अनेक मंत्र्याची महत्वाची खाती काढून घेतल्यास, त्यांची नाराजीसुध्दा पक्षाला ओढवून घ्यावी लागणार आहे.

भाजपमधून कुणाला संधी ?

विदर्भ
1) मदन येरावार,
मतदारसंघ- यवतमाळ
तिसर्‍यांदा आमदार

2) सुनील देशमुख,
मतदारसंघ- अमरावती
माजी राज्यमंत्री

मराठवाडा
1) संभाजीराव निलंगेकर
मतदारसंघ- निलंगा मतदारसंघ
दुसर्‍यांदा आमदार

उत्तर महाराष्ट्र
1) जयकुमार रावल
मतदारसंघ- सिंदखेडा, (धुळे)
तिसर्‍यांदा आमदार

पश्चिम महाराष्ट्र
1) सुभाष देशमुख
मतदारसंघ- सोलापूर दक्षिण
तिसर्‍यांदा आमदार

2) शिवाजीराव नाईक
मतदारसंघ-शिराळा
तिसर्‍यांदा आमदार

मुंबई
1) आशिष शेलार,
मतदारसंघ-वांद्रे (पश्चिम)
मुंबई भाजपाध्यक्ष

2) रवींद्र चव्हाण
मतदारसंघ-डोंबिवली
दुसर्‍यांदार्*िं आमदार

कुठल्या मंत्र्याची खाती जावू शकतात?

1) एकनाथ खडसे – यांच्याकडे सध्या सहा खाती आहेत. उत्पादन शुल्क आणि कृषी खात जावू शकते
2) पंकजा मुंडे – सध्या चार खाती. जलसंधारण खातं जाऊ शकतं
3) विनोद तावडे – शिक्षण आणि संस्कृतीशी संबंधित 6 खाती. उच्च व तंत्र शिक्षण, आणि वैद्यकीय शिक्षण खातं जाऊ शकतं
4) चंद्रकांत पाटील – तीन खाती आहेत. पणन आणि वस्त्र्योद्योग जाऊ शकतं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा