पोटनिवडणुकीत 99 टक्के मतदान

March 26, 2010 2:40 PM0 commentsViews: 1

26 मार्चकोकण विधानपरीषदेच्या पोटनिवडणुकीत 99.48 टक्के मतदान झाले आहे. एकूण 582 सदस्यांपैकी 579 जणांनी मतदान केले. पनवेलमधील दोन आणि चिपळूणमधील एका सदस्याने मतदानाचा हक्क बजावला नाही. सिंधुदुर्गात 100 टक्के मतदान झाले. निवडणुकीची मतमोजणी 28 मार्चला होणार आहे. मतदानाला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. रत्नागिरीच्या मतदान केंद्रावर सगळ्यात आधी शिवसेनेच्या महिला सदस्यांनी रांगा लावून मतदान केले. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 582 स्थानिक लोकप्रतिनिधींना एकूण 9 उपविभागीय कार्यालयात मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. राष्ट्रवादीच्या माणिक जगताप यांची बंडखोरी अनिल तटकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. अनिल तटकरे हे अर्थमंत्री सुनील तटकरेंचे भाऊ आहेत. भाजपच्या असहकाराचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसू शकतो. तरीही भाजपचे सदस्य सेनेबरोबर राहतील असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार उमेश शेट्ये यांना वाटत आहे.

close