अखेर तृप्ती देसाईंचा हाजी अली दर्ग्यात पोहोचल्या, पण मजारपर्यंत नाही !

May 12, 2016 9:11 AM0 commentsViews:

haji ali darga312 मे : अखेर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश केलाय. मात्र, त्यांना फक्त महिलांना जिथपर्यंत प्रवेश करायला परवानगी असते, तिथपर्यंतच जाता आलं. प्रत्यक्ष मझारीपर्यंत त्यांना जाता आलं नाही. यावेळी आपण प्रार्थना केल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलं. कोर्टाकडून लवकरच महिलांना मझारीपर्यंत जाण्याची परवानगी दिली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तृप्ती देसाई यांनी या आधीही हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. पण, मुस्लिम संघटनाच्या विरोधामुळे आणि पोलिसांची परवानगी संपल्यामुळे देसाईंना हाजी अली दर्ग्यात प्रवेश करता आला नाही. उलट आपल्या अडवल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याबाहेर निदर्शनं करण्यासाठी आंदोलन केलं होतं. या प्रकरणी गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा