अखेर 29,600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर

May 12, 2016 9:17 AM0 commentsViews:

maharshtra_drought_help12 मे : राज्य सरकारनं अखेर अधिकृतरित्या राज्यात दुष्काळ जाहीर केलाय. मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर राज्य सरकारला जाग आली असून 14 दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील 29,600 गावांमध्ये अधिकृतरित्या दुष्काळ जाहीर केला आहे.

50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. यापूर्वी शासनानं दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली होती. त्यात सुरूवातीला 14 हजार गावांचा समावेश करण्यात आला होता. नंतर, रब्बी पिकांची पैसेवारी आल्यानंतर या यादीत नवीन 11,000 गावांचा समावेश केला गेला. आता या सर्व 29,600 गावांमध्ये अधिकृतरित्या दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. तसंच दुष्काळसदृश ऐवजी दुष्काळ असा बदल करण्याच्या सुचना सरकारकडून महसूल प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या गावांतील सर्व शेतकर्‍यांना दुष्काळच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणार्‍या सर्व सोयी सुविधा देण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा