विराटला खेळू द्या, कॅप्टन करण्याची घाई नको -गावसकर

May 12, 2016 11:47 AM0 commentsViews:

gavasakar312 मे : विराट चांगला कॅप्टन असला तरी त्याच्यावर जबाबदारी देण्याची घाई नको, असं सल्ला माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सुनील गावसकर यांनी दिलाय. तसंच क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटसाठी विराटला वेळ द्यायला हवा असंही गावसकर म्हणाले.

याआधी सौरव गांगुलीनं धोणी हा 2019 च्या विश्वचषकापर्यंत भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व करू शकणार नाही. त्यामुळे विराट कोहलीला कर्णधार म्हणून पाहायला हरकत नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे विराटकडे लवकरच ही जबाबदारी सोपवायला हवी. तो आयपीएलमध्ये सुद्धा जबरदस्त प्रदर्शन करीत आहे. तो कर्णधारपदासाठी परिपक्व आहे, असंही गांगुली म्हणाला होता. मात्र, दुसरीकडे सुनील गावसकर यांनी धोणीची पाठराखण करत आताच विराटकडे आताच कॅप्टनपद नको अशी भूमिका मांडलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा