बच्चन फॅमिलीचा आलेख उंचावतोय

March 26, 2010 2:49 PM0 commentsViews: 6

26 मार्चअमिताभ बच्चन यांना आणखी एक आंतरराष्ट्रीय ऍवॉर्ड मिळाले आहे. ऐश्वर्या राय-बच्चनकडे या वर्षी मोठे सिनेमे आहेत. तर अभिषेक बच्चन मिलखा सिंगवरचा सिनेमा करण्याची शक्यता आहे. एकूणच बच्चन कुटुंबाचा आलेख पुन्हा एकदा उंचावत आहे. बच्चन खानदानाभोवतीचे प्रसिद्धीचं वलय दिवसेंदिवस जास्त प्रखर होत आहे. बिग बींना नुकताच हाँगकाँगमध्ये झालेल्या एशियन फिल्म फेल्टिवलमध्ये लाइफ टाइम ऍचिव्हमेंट ऍवॉर्ड मिळालं. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील काँट्रिब्युशनसाठी त्यांचा हा सन्मान झाला. एकीकडे बिग बी ऍवॉर्ड घेण्यात बिझी असताना, सूनबाई ऐश्वर्या भविष्यकाळातील ऍवॉर्डची तयारी करतेय. म्हणजे तिच्याकडे भरपूर मोठे सिनेमे आहेत. तिच्यावर एकूण 300 कोटी रुपये लागलेत. तिचे चार सिनेमे या वर्षी एका पाठोपाठ रिलीज होतील. त्यात मणि रत्नमचा रावण आहे. त्याचे बजेट आहे, 45 कोटी रुपये. रजनीकांतसोबतचा इंधिरन आहे 125 कोटींचा. संजय लीला भन्सालीसोबत ती गुजारिश करतेय. त्यात हृतिक रोशनही आहे. आणि त्याचे बजेट आहे, जवळपास 80 कोटी. विपुल शहाचा ऍक्शन रिप्ले बनलाय 60 कोटींचा. अभिषेक बच्चनही मागे नाही. राकेश मेहरा भाग मिलखा भाग सिनेमासाठी अभिषेकचा विचार करतोय. तर बातमी अशी आहे की स्वत: मिलखा सिंगचा चॉइस आहे अक्षय कुमार.. असो. पण एकूणच बच्चन कुटुंबाचा आलेख उंचावतच चाललाय हे नक्की.

close