म्हाडा देणार 7 लाखांत स्वस्त आणि मस्त घरं !

May 12, 2016 1:52 PM0 commentsViews:

स्वाती लोखंडे – मुंबई 12 मे : आता 1 बीएचके रुम मिळणार अवघ्या साडेसात लाख रुपयांत…दचकू नका..ही फसवणूक करणारी कोणती जाहिरात नाहीये…तर हा आहे म्हाडाचा नवा प्रकल्प… येत्या 3 वर्षांत अशी 1 लाख घर देण्याचा म्हाडाचा मानस आहे.

ठाणे महानगपालिका हद्दीच्या जवळच निळजे गावाजवळ असणारी महसुल खात्याची जवळपास 28 एकरची जागा..अगदी रस्त्यावरची…. रेल्वे स्टेशनही 1 किमी अंतरावर.. इथं म्हाडा अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी 5 हजार घरं बांधणार आहे. हे झालं फक्त एका निळजे गावचं.. पण म्हाडानं अशी 23 ठिकाणं निवडली आहेत. जिथं एक लाख 80 हजार घरं बांधली जाणार आहेत. आणि परवडाणार्‍या दरात म्हणजे अवघी साडेसात लाख रुपये किंमत असेल या घरांची…mahada_home_

हे घर 328 स्क्वेअर फुट कारपेट एरीयाचं घर.. एक बेडरुम, एक हॉल आणि किचन असं प्रशस्त असेल. प्रधानमंत्री आवाज योजनेंतर्गत बांधल्या जाणार्‍या या घरांसाठी महसूल विभागाची जागा निवडण्यात आलीये. जेणेकरुन नाममात्र दराने जमीन मिळाल्यान घरं स्वस्त राहतील. 2015 साली 55 ठिकाणांचा सर्वे म्हाडाने केला. आणि त्यातील 23 जागा प्रकल्पासाठी निवडल्या गेल्या.. यात

ठाणे- भंडार्ली, गोठेघर, खिडकाळी
कल्याण- बारावे, खोणी, शिरढोण, निळजे पाडा
वसई- बोळींज, जुचंद्र
पनवेल- विचुंबे, उसर्ली
कर्जत- वावे, वडवली
पेण- रामवाडी
भिवंडी- बापगाव, दापोडे
शहापुर- खर्डी
खालापूर- रीस

अशा ठिकाणांचा समावेश आहे. साडेसात लाख रुपये किंमत असणार्‍या य़ा घरांसाठी तुम्ही मुंबई मेट्रोपोलिटन रिजनचे रहिवासी असणं गरजेचं आहे आणि देशात कुठेही तुमचं घर नाही हे ही तुम्हाला सिद्ध करावं लागेल. त्याचबरोबर वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांच्या आत असणं गरजेच आहे. म्हाडानं केद्र सरकारला य़ा 23 ठिकाणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल दिल्यानंतर आतापर्यंत 14 प्रकल्पाना केंद्र सरकारने मान्यताही दिली आहे. तीन वर्षांत म्हाडा ही घरं बांधुन पूर्ण करणार आहे. इतकंच नाही तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधली जाणार्‍या या घरांना स्टॅप ड्युटी रजिस्ट्रेशनसाठी फक्त 1 हजार रुपये शुल्क आकारले असा प्रस्तावही सरकारच्या विचाराधीन आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा