मेघा पानसरेंची याचिका दाखल करून घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

May 12, 2016 3:04 PM0 commentsViews:

megha pansare on supreme

12 मे : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मेघा पानसरेंची याचिका दाखल करून घेण्यास सुप्रीम कोर्टानं आज नकार दिला आहे. समीर गायकवाड विरुद्ध चौकशी पूर्ण झाल्याशिवाय चार्जशीट दाखल करू नये ही मेघा पानसरे यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची सूचना सुप्रीम कोर्टानं केली आहे.

20 तारखेला कोल्हापूर सत्र न्यायालयात चार्जशिट दाखल होणार आहे. सुप्रिम कोर्टानं चार्जशीटची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आरोपी समिर गायकवाड विरोधात चौकशी पुर्ण होण्यापूर्वी चार्जशीट फाईल करू नये, यासाठी मेघा पानसरेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हाईकोर्टाने या संदर्भात सत्र न्यायालयाने निर्णय घ्यावा असं आदेशही दिले होते पण चौकशीत रोज नविन खुलासे होत असतांना चार्जशीटची घाई नको असं पानसरे कुटुंबीयांचे म्हणणं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा