अबब…घरात आढळले 150 साप !

May 12, 2016 3:09 PM0 commentsViews:

12 मे : एकाच राहत्या घरात शंभराहुन जास्त साप आढळून आले तर? असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथे रविवारी एका घरात घडला. घरात एक साप दिसला. त्यानंतर दुसरा मग तिसरा असे करत करत अनेक साप एकाच घरात आढळुन आलेत.

up snekवन विभागाचे माजी अधिकारी जितेंद्र मिश्रा यांनी सांगितल की, शनिवारी सकाळी घरातील जिन्यांखाली एक साप दिसला. तेव्हा घरातील मुलांनी त्याला पकडुन जंगलात सोडलं. सकाळी जितेंद्र घराबाहेर पडतांना त्याच जागी अजून दोन साप आढळून आहे. बघता-बघता संध्याकाळपर्यंत जितेंद्र यांच्या घरी वीस पेक्षा जास्त साप आढळून आले. यामुळे घरात भीतीचे वातावरण निर्माण झालं.

ही बातमी परिसरातील लोकांना कळल्यावर सर्वांची घराबाहेर एकच झुंबड उडाली. सापाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाने रात्र जागून काढली. सकाळ होताच जितेंद्र यांनी सर्पमित्र रामचंद्र यांना बोलावून घरात वीस पेक्षा जास्त साप आढल्याचं सांगितलं. रामचंद्र यांनी घराची पाहणी केली असता जिन्याखालील बंद स्टोअर रुमकडे लक्ष गेलं. आणि त्यांनी स्टोअर रुमची भिंत पाडायची सांगितलं. लोकांच्या मदतीने त्यांनी भिंत पाडली असता त्यात 150 साप आढळून आले. रामचंद्र यांनी चिमट्याच्या मदतीने एका डब्ब्यात साप बंद करुन जंगलात सोडले. आपल्याच घरात शंभराहुन जास्त साप आढळल्याने संपूर्ण कुटुंब अजुनही दहशतीखाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा