नाशिकमध्ये रामरथ मिरवणूक

March 26, 2010 3:22 PM0 commentsViews: 8

26 मार्चसव्वा दोनशे वर्षांची परंपरा असलेली रामरथाची मिरवणूक आज नाशिकमध्ये काढण्यात आली. अत्यंत आकर्षक पद्धतीने निघालेले रामरथ आणि गरुडरथ काळाराम मंदिरातून निघाले. राजकीय नेत्यांनी गर्दी करू नये असा इशारा भाजपने दिला होता. मंदिर व्यवस्थापनानेही त्याबाबत दक्षता घेतली होती. पण ऐतिहासिक परंपरा असलेल्या या रथयात्रेत नेत्यांनीच मिरवून घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. दीक्षितांच्या मानाच्या पुजेने या मिरवणुकीची सुरुवात झाली. रथात रामाच्या पादुका ठेवून गावातून त्यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. ही रथयात्रा रामाची की नेत्यांची असा सवाल करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत त्याला विरोध केला. महापौर नयना घोलप आणि आमदार वसंत पवार यांच्यासह काही राजकीय कार्यकर्ते रथावर होते.

close