दारू आणि गोमांस बंदीमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान – गोदरेज

May 12, 2016 4:34 PM0 commentsViews:

adi godrej

12 मे :  देशातील अनेक राज्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या दारू आणि गोमांस बंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं मोठा धक्का बसत असं मत उद्योगपती आदी गोदरेज यांनी व्यक्त केलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लागू असलेली गोमांसबंदी आणि दारूबंदी याबद्दल उद्योगजगतातून प्रथमच प्रतिक्रिया उमटली आहे.

गेल्या दोन वर्षांत उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मोदी सरकारच्या अनेक धोरणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. मात्र, काही गोष्टींमुळे या विकास प्रक्रियेत बाधा येत आहे. उदाहरणार्थ काही राज्यांमध्ये असलेली गोमांस बंदी. त्यामुळे ग्रामीण आणि कृषी विकासावर विपरीत परिणाम होत आहे. अनेक शेतकर्‍यांसाठी हा उत्त्पन्नाचा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर आणि उद्योगांवर नकारात्मक परिणाम होत आहे, असं गोदरेज यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं.

तसंच निवडणुकांमध्ये महिलांची मते मिळवण्यासाठी केरळ आणि बिहार यांसारख्या राज्यांनी दारूबंदी लागू केली आहे. बंदी ही कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी आणि सामाजिक रचनेसाठी वाईट असते. त्यामुळे उलट दारूच्या बेकायदेशीर व्यापाराला आणि माफियांना चालना मिळेल. त्याचबरोबर, जगभरात असे निर्णय अयशस्वी ठरले आहेत, याकडेही गोदरेज यांनी लक्ष वेधलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा