बुलडाण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी केलं विषप्राशन, तिघांचा मृत्यू

May 12, 2016 4:22 PM0 commentsViews:

Buldhana2133

12 मे :  बुलडाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील मालठाना गावात एकाच कुटुंबातील चार जणांनी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तर एक जण अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर अकोल्यात उपचार सुरू आहेत.

मसाने कुटुंब मोलमजुरी करुन गुजराण करत होते. त्यांच्याकडे एक एकर शेती असून त्यांच्यावर एक लाख रुपयांचं कर्ज होते. या एक लाखांच्या कर्जामुळेच मसाने कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. पण नेमकं कोणत्या कारणाने यांनी हे विष घेतलं ते स्पष्ट झालं नाही आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा