लातूरला रेल्वेनं पाणी पोहोचवण्याचं बिल 4 कोटी रुपये!

May 12, 2016 7:03 PM0 commentsViews:

Train loading water

12 मे :   दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चार कोटी रुपयांचे बिल आकारले आहे. महिन्याभरापूर्वी रेल्वेने पहिल्यांदा पाणी एक्स्प्रेसने पाणी लातूरला पोहोचवलं. रेल्वेने आतापर्यंत 6.20 कोटी लिटर पाणी दुष्काळग्रस्त लातूरला पोहोचवलं आहे. पाण्याच्या वाहूतक खर्चापोटी रेल्वेने 4 कोटींचे बिल जिल्हाधिकार्‍यांना पाठवलं आहे.

प्रशासनाच्या विनंतीवरुन आम्ही लातूर जिल्हाधिकार्‍यांना हे बिल पाठवलं असं मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के.सूद यांनी सांगितलं. पश्चिम महाराष्ट्रातील मिरजेतून पाणी भरल्यानंतर 11 एप्रिलला पहिली पाणी एक्स्प्रेस लातूरला रवाना झाली. 12 एप्रिलच्या मध्यरात्री ट्रेन लातूरमध्ये दाखल झाली.

मिरज ते लातूर एकूण अंतर 342 कि.मी.चे होते. लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी खास राजस्थान कोटा इथून ट्रेन मागवण्यात आली होती. सुरुवातीला पाणी एक्स्प्रेसला 10 डब्बे जोडलेले होते. प्रत्येक डब्ब्यामध्ये 50 हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता होती. त्यामुळे पहिल्या काही फेर्‍यांमध्ये प्रत्येकवेळी 5 लाख लिटर पाणी लातूरला पोहोचवण्यात आलं आहे.

लातूर शहराची लोकसंख्या चार लाखापेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागातील 943 गावांमध्ये 18 लाख लोकसंख्या आहे. अपुर्‍या पावसामुळे लातूरमध्ये जलाशय, धरणे, नद्या आणि विहीरी आटल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा