मुंबईत 10 वर्षांनंतर 6 डान्स बार होणार सुरू

May 12, 2016 9:29 PM0 commentsViews:

dance-bar-bar-girls_bdbdbae0-e058-11e5-9948-13623a58218c

12 मे :  मुंबईत पुन्हा एकदा छमछम सुरू होणार आहे. मुंबई पोलिसांकडून आज (गुरूवारी) तीन डान्सबारना परवाने देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा डान्सबार सुरू होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.

राज्य सरकारच्या जाचक अटींविरोधात आणि डान्सबारचे पुन्हा परवाने मिळावे यासाठी डान्स बार मालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला मुंबईतील 8 डान्सबारना तातडीने परवाने देण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार इंडियाना, साईप्रसाद आणि एरो पंजाब या डान्सबारना मुंबई पोलिसांकडून परवाने देण्यात आले आहेत. उर्वरित 5 डान्सबारना परवान्याची रक्कम जमा करताच, डान्स बार सुरू करण्याचा परवाना देण्यात येणार आहे. डान्स बारसंदर्भात राज्य सरकारनं एकूण 27 नियम तयार केले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा