बाबरीविषयी अडवाणींच्या विरोधात साक्ष

March 26, 2010 3:34 PM0 commentsViews: 2

26 मार्च बाबरीचे भूत आज भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या मानगुटीवर पुन्हा बसले. बाबरी मशीद पडून 17 वर्षे झाल्यानंतर या खटल्यातील एका महत्त्वाच्या साक्षीदाराने अडवाणींच्या विरोधात साक्ष दिली आहे.लालकृष्ण अडवाणींसोबत असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अंजू गुप्ता यांनी रायबरेलीतील विशेष CBI कोर्टासमोर आज आपली साक्ष नोंदवली. त्या म्हणाल्या की बाबरी मशीद पडण्याआधी मशिदीपासून दीडशे मीटरवर लालकृष्ण अडवाणी यांनी एक प्रक्षोभक भाषण केले. मशीद पाडली जात असताना त्यांनी कारसेवकांना थांबवले नाही. तसेच बाबरी मशीद कोसळल्यावर उमा भारती, साध्वी ऋतंभरा आणि मुरली मनोहर जोशी यांनी मिठाई वाटली आणि अडवाणींचे अभिनंदन केले असेही अंजू गुप्ता म्हणाल्या.

close