डान्सबारमध्ये दारू पिण्यास मनाई

May 13, 2016 12:08 PM0 commentsViews:

535658dance_barमुंबई- 13 मे : मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा छमछम सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डान्सबारला परवाने दिले जाणार आहे. पण राज्य सरकारने नव्याने तयार केलेल्या कायद्यानुसार डान्सबारमध्ये दारुबंदी असणार आहे. जरी दारू प्यायची असेल तर त्यासाठी वेगळ्या परमिट रुमचा आसरा घ्यावा लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतल्या सहा डान्स बारना पोलिसांनी अखेर परवानगी दिली. मात्र त्याच वेळी डान्स बारबाबतच्या नव्या कायद्यानुसार यापुढे परवाने मागणार्‍या डान्स बारमध्ये दारू पिता येणार नाही किंवा सिगारेट ओढता येणार नाही. आता डान्स बार केवळ नृत्यापुरतेच उरणार आहेत.

दारु पिण्यासाठी डान्स बारमध्ये स्वतंत्र परमिट रूमची व्यवस्था करता येईल. त्याव्यतिरिक्त अन्यत्र दारूबंदी राहील. विशेष म्हणजे हा नवा कायदा येण्याआधी गुरुवापर्यंत आठ डान्स बारना परवाने द्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मंगळवारी दिला होता.

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, नवीन कायद्यातील अटींची पूर्तता करणार्‍यांनाच ते दिले जातील अन्यथा नाही, असं स्पष्ट केलं. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येताच सहा बारना परवानगी देण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा