परभणीतही नर्स आणि कर्मचार्‍यांचा डीजेवर ‘झिंगाट डान्स’

May 13, 2016 1:22 PM0 commentsViews:

 parbhani

परभणी – 13 मे : मुंबईपाठोपाठ परभणीत नर्सिंग डेच्या निमित्ताने सिस्टर्सनी डीजे लावून धिंगााणा केल्याच प्रकरण समोर आलाय. 12 मे रोजी परिचारिका दिन साजरा करतांना रुग्णसेवेला या सिस्टर्सनी हरताळ फासलाय.

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील 12 मे रोजी नर्सिंग डेच्या निमित्ताने प्रशिक्षण केंद्राजवळ स्टेज उभारून डीजेलावून डॉक्टर, सिस्टर्स आणि कर्मचार्‍यांनी शांताबाई, रिक्षावाला आणि झिंग झिंग झिंगाटवर तुफान धिंगाणा घातला. महत्वाचं म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.जावेद अथरसह सर्वच वैद्यकीय अधिकारी स्टेजवर बसून सर्व धिंगाणा पाहत होते. मोठा आवाज असलेल्या डीजे मुळे रुग्णालयातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला. जिल्हा रुग्णालय परिसर हा सायलेन्स झोन असताना एवढ्या मोठ्या आवाजाच्या डीजेला परवानगी दिली कशी असा प्रश्न उपस्थित केला जातोय. महत्वाचं म्हणजे नर्सिंग डेच्या नावाखाली दोन दिवस हा धिंगाणा सुरू होता. जिल्हा शल्य चिकित्सक जावेद अथर यांना विचारले असताना त्यांनी काही न बोलता येथून पळ काढला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा