मान्सून येतोय, 3-4 दिवसांत अंदमानला धडकणार !

May 13, 2016 2:13 PM0 commentsViews:

 mansoon in maha

पुणे -13 मे : दुष्काळाचे चटके सहन करणार्‍या महाराष्ट्रावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असून मान्सून लवकरच दाखल होणार आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत मान्सून अंदमानला धडकणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. अंदमानला मान्सून पोहोचल्यानंतर त्याची पुढची वाटचालही महाराष्ट्राच्या दिशेनं असणार आहे. त्यामुळे बळीराजाला हा मोठा दिलासा मिळालाय.

सलग दुसर्‍या वर्षीही महाराष्ट्र दुष्काळाला सामोरं जातोय. मराठवाड्यासह विदर्भ आणि खान्देशमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालीये. मात्र, यंदा अल निनो वादळाचा प्रभाव ओसरल्यामुळे यंदा 106 टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय. या गोड बातमीनंतर आता पुणे वेधशाळेनंही मान्सूनबद्दल चांगली बातमी दिलीये. येत्या 3 ते 4 दिवसांत मान्सून अंदमानद्वीपमध्ये दाखल होणार आहे अशी माहिती पुणे वेधशाळेच्या संचालकी सुनीतादेवी यांनी दिलीये. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. जो मान्सूनच्या वाटचालीला पुरक असेल. त्यामुळे साधारणत:हा 16 ते 17 मेला मान्सून दाखल होण्याचं भाकित पुणे वेधशाळेनं वर्तवलंय. दरम्यान, हवामान खात्याने बळीराजा दिलासा दिलाय. राज्यात यंदा 27 टक्के अधिक पाऊस पडणार आहे. पावसाचा पट्टा असलेल्या कोकणात 27.20 टक्के जास्तीच्या पावसाचा अंदाज आहे. एवढंच नाहीतर जुलै आणि ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

यंदा राज्यात 27 टक्के जास्त पाऊस

- विदर्भ – 31.3 टक्के जास्त
– मध्य महाराष्ट्र – 28.2 टक्के जास्त
– मराठवाडा – 24.9 टक्के जास्त
– कोकण – 27.5 टक्के जास्त


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा