मल्ल्यांची चौकशी सुरू

March 26, 2010 3:40 PM0 commentsViews:

26 मार्च विजय मल्ल्यांची आयपीएल टीम क्रिकेटमध्ये चांगला खेळ करतेय. पण किंगफिशरच्या निमित्ताने मल्ल्यांना मात्र सध्या वेगळ्याच गोष्टींचा सामना करावा लागतोय.मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईन्सने हवाई सुरक्षेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्या कंपनी ठेवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी कुठलीही पूर्व सूचना न देता, त्यांचे खासगी हेलिकॉप्टर जेटच्या रनवेवर उतरवले होते. याप्रकरणी मल्ल्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याची नागरी हवाई वाहतूक सुरक्षा यंत्रणेकडून चौकशी सुरु आहे, पण मल्ल्यांनी मात्र या सगळ्या गोष्टींचा इन्कार केला आहे.

close