निरंकारी पंथाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं अपघाती निधन

May 13, 2016 3:07 PM0 commentsViews:

Nirankari Baba Hardev Singh

13 मे :  संत निरंकारी समुदायाचे प्रमुख हरदेव सिंह यांचं कॅनडात एका भीषण अपघातात निधन झालं आहे. संपूर्ण जगभरात निरंकारी बाबांचे लाखो भक्त आहेत. हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने निरंकारी समुदायावर शोककळा पसरली आहे. हरदेव सिंह 62 वर्षांचे होते.

देशासह जगभरात निरंकारी पंथाची महती पोहोचवण्यात बाबा हरदेव सिंह यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात एका कार्यक्रमला जात असताना हरदेव सिंह यांची कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की हरदेव यांचा जागीच मृत्यू झाला. बाबा हरदेव सिंह यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1954 रोजी त्यांचा दिल्लीत त्यांचा जन्म झाला. 1980 साली वडिलांच्या हत्येनंतर हरदेव सिंह निरंकारी संप्रदायाचे सर्वेसर्वा झाले. जगभरातील 27 देशांमध्ये सध्या हरदेव सिंह यांच्या निरंकारी पंथाच्या 100 हून अधिक शाखा आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा