मोदी उद्या एसआयटीपुढे

March 26, 2010 3:45 PM0 commentsViews: 1

26 मार्च गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गुजरात दंगलप्रकरणी उद्या एसआयटीपुढे हजर राहणार आहेत. मोदी उद्या त्यांच्या वकिलासोबत एसआयटीच्या टीमसमोर चौकशीसाठी हजर राहतील. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका याचिकेच्या सुनावणीवरुन एसआयटीने मोदींना समन्स बजावले आहे. गुजरातच्या गुलनर्ग लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांची हत्या याच दंगलीदरम्यान करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी ही याचिका दाखल केली.

close