व्याजाच्या पैशासाठी महिलेवर वारंवार अत्याचार करणार्‍या सावकारांना अटक

May 13, 2016 5:05 PM0 commentsViews:

KOL_121

13 मे : व्याजाच्या पैशासाठी महिलेवर वारंवार बलात्कार करणार्‍या 2 सावकारांना अटक करण्यात आली आहे. धर्मेंद्र बागडे आणि संदीप बागडे अशी या दोन सावकारांची नावं आहेत. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी विविध कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हाूपर शहरातल्या मोतीनगर भागामध्ये पीडित महिलेनं या दोन्ही सावकारांकडून दीड वर्षांपूर्वी 20 टक्के व्याजाने 10 हजाराचे कर्ज घेतले होते. या कर्जापोटी त्या महिलेने चार हजार रुपये सावकाराला परत दिले आहेत. परिस्थितीमुळे तिला काही महिन्यापासून या सावकाराचे हप्ते देता आले नाहीत. सावकार बागडे याने याचा गैरफायदा घेत पीडित महिलेवर दबाव टाकत रात्री अपरात्री विविध ठिकाणी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घरातील लोकांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर जात पंचायतीसमोर हा विषय का नेला, म्हणून या सावकारांनी दहा ते बारा जणांना घेऊन पीडित महिलेच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली. महिलेचा पती, दीर, भावजय यांना मारहाण करून गंभीर जखमी केले होते. यानंतर पीडित महिलेने राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कालपासून हे दोन्ही सावकार फरार होते. पण मध्यरात्री पोलिसांना माहिती मिळाल्यावर सापळा रचुन या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही सावकारांवर बलात्कार, खासगी सावकारी, खंडणी मागणे, घरात घुसुन मारहाण करणे असे गुन्हे दाखल केले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा